पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची तृणमूल काँग्रेसची यादी जाहीर

March 06,2021

कोलकाता, 6 मार्च : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणूकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या 291 उमेदवारांची यादी जाहीर केली. या वेळी युवक, अल्पसंख्याक, महिला आणि मागासवर्ग समाजातील उमेदवारांंना तिकिटे देण्यात आली आहेत. स्वतः ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

तृणमूल काँग्रेसचा घटक पक्ष असलेल्या गुरखा जनमुक्ती मोचा4च्या बिमल गुरुंग गटासाठी दार्जिलिंगमधील तीन जागा सोडण्यात आल्या आहेत. यावेळी आम्ही युवक आणि महिला उमेदवाराां अधिक उमेदवारी दिली आहे. जवळपास 23-24 विद्यमान आमदारांना वगळण्यात आले आहे. उमेदवारांच्या यादीत 50 महिला, 42 मुस्लिम, 79अनुसूचित जाती आणि 17 अनुसूचित जमातीच्या उमेदवाराां तिकिटे दिली आहेत, असे बॅनर्जी यांनी सांगितले.

आपण सलग तिसर्‍यांदा सत्तेवर येणार असल्याचा विश्‍वास ममता बॅनर्जी यांंनी व्यक्त केला असून तृणमूल काँग्रेससाठी आतापर्यंतची ही सर्वात सोपी निवडणूक आहे. असे मुख्यमंत्री म्हणाल्या, सत्तेवर आल्यानंतर आम्ही ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना सामावून घेण्यासाठी विधानपरिषदेची निर्मिती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांचे वय 80 वर्षाहून अधिक आहे त्या प्रत्येकाला आम्ही सामावून घेऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या.