दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने युवकाचा वैनगंगेत बुडून मृत्यू

October 17,2020

गडचिरोली, 17 ऑक्टोबर : मुलीला दुचाकी चालविणे शिकवित असताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी वैनगंगेच्या पुलास धडकून दुचाकीवरील युवकाला वैनगंगा नदीत जलसमाधी मिळाली तर मुलगी जखमी होऊन बचावली. ही घटना आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर घडली.

ईर्शाद शेख रा. वाडी नागपूर असे बेपत्ता युवपकाचे नाव आहे. मुलीचे नाव शेडमाके असे असून ती आरमोरी येथील आझाद चौकातीील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. ईर्शाद शेख हा एमएफ 49 बीएफ 3593 क्रमांकाच्या दुचाकीने शेडमाके नामक मुलीस दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देत होता. ते दुचाकीने वैनगंगा नदी पार करीत असतांना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीने पुलावरील लोखंडी कठड्यास धडक दिली. या अपघातात ईर्शाद शेख हा थेट वैनगंगेच्या पात्रात कोसळला. मात्र दुचाकीव व मुलगी खांबास धडकल्यानंतर पुलावर कोसळली. यामध्ये मुलगी जखमी झाली. अपघात झाल्याचे कळताच नागरिकांची गर्दी जमली. पोलिस विभागाने नदीच्या पात्रात शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही.