आज जग भारतीयांकडे संशयाने बघते आहे - प्रकाश आंबेडकर

August 05,2020

मुंबई : ५ ऑगस्ट -  पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या बांधकामाची पायाभरणी झाली असताना, अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. आंबेडकर यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही आक्षेप नोंदवला आहे.

अयोध्येत उभारण्यात येणार्या राम मंदिरावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. आज संपूर्ण जग भारतीयांना संशयाच्या नजरेने पाहत आहे. आपल्याला वाटते की, ते द्वेष करत आहेत. पण, सत्य परिस्थिती ही आहे की, इथले वैदिक धर्म मानणार्यांनी अन्य धर्मांवर अतिक्रमण करत आहेत. जे सध्या अयोध्येत होत आहे. इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांनीही म्हटलेले आहे की, अयोध्येत प्राचीन बौद्ध शिक्षा केंद्र आहे. अलहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्खननामध्ये तिथे बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडले. असे असूनही उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने तथ्याच्या उलट, भावनांच्या आधारावर राम मंदिर बांधण्याचा निर्णय दिला. तथ्यांच्या आधारावर निर्णय झाला असता, तर जगाने संशय घेतला नसता. असे न केल्यामुळे जगभरात भारत व भारतीयांची प्रतिमा मलिन झाली आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.