खासदार अमर सिंह यांचे निधन

August 01,2020

नवी दिल्ली : १ ऑगस्ट - समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचा दीर्घ आजारानं मृत्यू झालाय. गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून ते आजारी होते. सिंगापूरच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. इथंच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. 

उत्तर प्रदेशच्या अतिशय महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अमर सिंह यांचं आजपर्यंत वजन होतं. काही महिन्यांपूर्वी आजारी असलेल्या अमर सिंह यांनी उपचारासाठी सिंगापूर गाठलं होतं. 

अमर सिंह यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात १९९६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर झाली होती. समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांची राजकीय सक्रीयता थोडी कमी झाली होती. आजारी पडण्यापूर्वी ते भाजपच्या अतिशय जवळही आले होते.