मद्यपी नवऱ्याला धाक दाखवायला गेली नि स्वतःचा जीव गमावून बसली

August 01,2020

नागपूर : १ऑगस्ट - बाहेरून मद्यप्राशन करून आलेल्या पतीला धाक दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीला  आपला जीव गमवावा लागला हि घटना कळमना हद्दीतील बालाजी नगर येथे घडली. शमशाद एजाज शेख असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. शमशाद चे इजाजसोबत ६ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तो एका खासगी कांपनीत नोकरीला होता. रात्री तो उशिरा मद्यप्राशन करून आल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला रंगाच्या भरात मुंग्या मारण्याचे कीटनाशक शमशादने  हाती घेतले व धाक दाखविण्यासाठी खाऊन घेतले काही वेळानंतर तिला उलट्या सुरु झाल्या. आज पहाटे २ च्या सुमारास इजाजने आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली व मेयो इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.