संकल्प तर्फे रेल्वे प्रवासी मजुरांना जेवणाचे डब्बे वाटप - डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनार्थ प्रवाशांना मदतीचा हात

May 25,2020

नागपूर, २५ मे २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती आहे. सर्व उद्योगधंदे बंद पडल्याने शेकडोच्या संख्येने मजुरवर्ग त्यांच्या घरी परतण्याच्या प्रयत्नात आहे. रविवारी नागपूर रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेशला जाणारी नागपूर -गोरखपूर श्रमिक एक्सप्रेस रवाना झाली. या रेल्वेने प्रवास करणाऱ्या मजुरांना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनार्थ संकल्प या सेवाभावी संस्थेमार्फत जेवणाचे डब्बे वाटप करण्यात आले.


कोविड-१९ च्या प्रार्दुभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत उत्तर नागपुरातील गरजू आणि गरिबांना "संकल्प" या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून १९ एप्रिल पासून शिजवलेले अन्न घरपोच देण्यात येत आहे. रोज सकाळ-संध्याकाळ एकूण २६ हजार जेवणाचे डब्बे घरपोच देऊन, कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. मजुरवर्ग त्यांच्या घरी परतण्याच्या प्रयत्नात आहे. रविवारी डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत गोराखपूरला रवाना झालेली श्रमिक एक्सप्रेस मधील मजुरांना प्रवासादरम्यान जेवणाची व्यवस्था करण्याच्या अनुषंगाने प्रवाशांना मदत म्हणून जेवणाचे डब्बे वितरित करण्यात आले.


याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सिनीयर डी सि एम, पाटिल, रेल्वे  व्यवस्थापक, नागदिवे, अशोक हुमणे,  राजेंद्र करवाडे, अनिल नगरारे, तकक्षिला वाघधरे, सुरेश पाटिल, विनोद राऊत, विनोद शेंडे, विनय सहारे, दीपक खोब्रागड़े, संघपाल उपरे, संदीप वासनिक, आतिश साखरे, भरत  रंगारी, सतीश पाली, निलेश खोब्रागड़े, भाऊ सचिन वासनिक, चेतन तरारे, आकाश इंदुरकर, पंकज नगरारे व संकल्स्वयंसेवी संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.