लग्नाचे आमिष दाखवून तब्बल एक वर्ष तृतीयपंथी महिला वकिलाचे शारीरिक शोषण करणाऱ्या नितीन सोळंके उर्फ भाया वर गुन्हा दाखल
May 13,2025
* तिची सुंदरता बघून केलं होतं प्रेमाचं खोटं नाटक
* तिला इमोशनल ब्लॅकमेल करून तब्बल 95 हजार केले वसुल
* ब्रेकअप झाल्यानंतरही त्याने लावला होता शरीर सुखासाठी तगादा
* अनेक सार्वजनिक ठिकाणी अडवून तिला केली होती अश्लील शिवीगाळ
* त्याच्या त्रासापोटी ती मागील चार महिन्यापासून घेत होती डिप्रेशनच्या गोळ्या
* आत्महत्येचं पाऊल उचलायला ती झाली होती मजबूर
तृतीयपंथी वकील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल एक वर्ष तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या तसेच, तिला प्रेमापोटी वारंवार पैशाची मागणी करून इमोशनल ब्लॅकमेल करणाऱ्या नितीन सोळंके उर्फ भाया वर रामनगर पोलिसांनी 9 मे 2025 ला गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानंतर आरोपी फरार असून पुढील तपास चालू आहे.
नितीन सोळंके उर्फ भाया याची ओळख वर्धा येथील कोर्टाच्या मानिमित्त तृतीयपंथी महिला वकीलासोबत झाल्यानंतर तिची सुंदरता बघून तिच्याशी जवळीक साधण्याचा त्याने प्रयत्न केला. काही महिन्यानंतर परत स्वालंबी ग्राउंड मध्ये पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर दोघांमध्ये बोलचाल वाढली. नितीन ने तिला तिच्या पर्सनल लाईफ बद्दल विचारले असता तिने एकटी असल्याचे सांगितले यावर नितीन ने "तू एकटी कधीपर्यंत राहशील तुला कधी तर तुझा पार्टनर बघावा लागेल ", " मला तू खूप आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तुला मुलं होऊ शकत नाही पण लग्नानंतर आपण एखादा मुलगा दत्तक घेऊया " असे म्हटले.
दहा वर्षा अगोदर नितीन चे लग्न झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशीच त्याची बायको त्याला सोडून गेली, ही कहाणी तिच्यासमोर सांगितल्यामुळे ती भावुक झाली व दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले आणि त्यांच्यात शारीरिक संबंध होत गेले. नीतिन एकटा असल्यामुळे मला तुझ्या सोबत राहायचं आहे असे म्हटल्याने तिच्याकडे दोघेही जण पती-पत्नी प्रमाणे राहू लागले.
नितीन हा बँकेमध्ये डेली कलेक्शनचे काम करत असून त्याला महिन्याचे फक्त 8,500/- रुपये मिळतात, त्यातही त्याला रोज दारू पिण्याचे व्यसन आहे. तिची कमाई चांगली आहे हे बघून तिला वारंवार दारू पिण्याकरिता नितीन हा पैशाची मागणी करत होता, प्रेमापोटी तिने पैसेही त्याला देऊ केले, ही सवय वाढल्याने तो कधी मोबाईल घेण्याकरिता, तर कधी गाडी घेण्याकरिता तिला पैशाची मागणी करत होता तरीही ती प्रेमापोटी त्याला पैसे देत गेली.
त्याच्या या त्रासाला कंटाळून तिने त्याला पैसे देणे बंद केले, नंतर जानेवारी 2025 मध्ये तिने नितीन ला लग्ना करिता विचारले असता त्याने " तू मला पैसे देऊ शकत नाही मला सांभाळू शकत नाही तर मी तुझ्याशी लग्न कशाला करू" असे उत्तर दिले.
हे एकूण तिला धक्का बसला व ती डिप्रेशन मध्ये गेली कारण नितीन ने लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 1 वर्ष तिचे शारीरिक शोषण केले होते.
याच कारणामुळे तिने नितीन सोबत सर्वच प्रकारचे संबंध कायमचे तोडले होते. तरीही नितीन तिच्या घरी दारू पिऊन जबरदस्ती घुसला व तिला अश्लील शिवीगाळ करू लागला, तिला अनेक ठिकाणी अडवून परत शारीरिक संबंध ठेवण्याकरिता तो तगादा लावत होता.
19 मार्च 2025 ला सायंकाळी साडे सातच्या दरम्यान स्वावलंबी ग्राउंड वर नितीन ने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तिने आजपर्यंत दिलेले 95 हजार मला कधी परत करशील असे विचारले असता त्याने "मी तुला पैसे तर परत करणार नाही पण तुले चाकू मारून देईन, तुले जे कराच हाये ते करून घे " असे उत्तर दिले. आणि अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
एका तृतीयपंथीला खोटं लग्नाचं आम्हीच दाखवून तिचं शारीरिक शोषण करणे व तिला इमोशनल ब्लॅकमेल करणे हे कितपत योग्य आहे? ज्या लग्न समारंभात आपण तृतीयपंथींचे आशीर्वाद पवित्र मानतो त्या तृतीयपंथी सोबत असा प्रकार घडला कितपत योग्य आहे? याच कारणांमुळे संपूर्ण देशामध्ये तृतीयपंथीयांच्या आत्महत्याचे प्रमाण 32% ते 50% पर्यंत पोहचले आहे.