दहा शाळांतील विद्यार्थ्‍यांनी साकारले ‘ग्रीन गणेशा’

August 16,2022

ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्‍या कार्यशाळेला उत्‍स्फूर्त प्रतिसाद

नागपूर, 16 ऑगस्‍ट :
ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्‍यावतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या ‘ग्रीन गणेशा’ या कार्यशाळेला शहरातील दहा शाळांतील विद्यार्थ्‍यांचा उत्‍स्फूर्त सहभाग लाभला. विद्यार्थ्‍यांनी तज्‍ज्ञ मूतिकारांच्‍या मार्गदर्शनात मातीच्‍या देखण्‍या मूर्ती तयार करून त्‍याला रंगरंगोटी केली त्‍यावेळी त्‍यांच्‍या चेहे-यावर आनंद आणि समाधान उमटले.

शनिवारी लालबहादूर शास्त्री मनपा हनुमान नगर, विनायक राव देशमुख लकडगंज, साऊथ पॉइंट स्‍कूल, दुर्गानगर मनपा शाळा, सोमलवार निकालस, प्रहार रविनगर व ललिता पब्लिक स्कूलमध्‍ये तर रविवारी महात्मा गांधी जरीपटका, पं. बच्‍छराज व्यास व हिंदू मुलींची शाळा येथे ही कार्यशाळा घेण्‍यात आली.

प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्‍यासाठी व घरोघरी मातीच्‍या गणपतीची स्‍थापना व्‍हावी, या उद्देशाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या या कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षक आमदार नागो गाणार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाला ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले यांच्‍यासह आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, योगेश बन, किशोर भागडे, अनिल देव, अशोक सायरे, सुधीर कपूर, उपेंद्र वालदे, मनोज भालेराव, सचिन कावळे, अनुपमा सायरे, भाग्यश्री चन्ने, दीपाली ढोमणे इत्‍यादींची उपस्‍थ‍िती होती.

कार्यशाळेच्‍या यशस्‍वीतेसाठी विजय फडणवीस, अनिल झोडे, गिरधारी निमजे, कल्‍पना मानापुरे, विजय अग्रवाल, आशा बोरकर, चेतना सातपुते, दिपाली अवचट, भाग्‍यश्री तलखंडे, अश्विनी बेले, हर्षा जोशी, गीता जाधव, प्रणिता लोखंडे, चित्रा माकडे, राजकुमार कनाटे, राजकुमार भोंबाटे, संजय पुंड, श्रीकांत गडकरी, नरेश कामडे आदींचे सहकार्य लाभले.