कुख्यात गुंड रंजित सफेलकरचा साथीदार रवी उर्फ छोटु बागडे याचा 28 मे पर्यंत पीसीआर !

May 18,2021

🚨 नागपूर पोलीसांची माहीती.
नागपूर, दि. 18 : शहरातील बहुचर्चित मनिष श्रीवास हत्याकांडातील कुख्यात गुंड रंजित सफेलकर, भरत हाटे, शरद हाटे, श्रीनिवास उर्फ सिनु अन्ना अंजय्या वियनवार व त्यांचे इतर साथीदारांना गुन्हे शाखा, पोलीसांनी अटक केली असुन या हत्याकांडातील आरोपींविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अन्वये तपास प्रगतीपथावर आहे.
या हत्याकांडाच्या तपासादरम्यान दि. 28 एप्रिल 2021 रोजी रंजित सफेलकर याचा साथीदार व मनिष श्रीवास हत्याकांडात सहभागी असलेला आरोपी रवि उर्फ छोटु टिकाराम बागडे (वय 39 वर्षे) राहणार कपीलनगर, एन.आय.टी क्वार्टर जवळ नागपुर, संजय गांधी
नगर, राणी दुर्गावती चौकाजवळ नागपुर यास गुन्हे शाखा पोलीसांनी अटक केली
होती. आरोपी रवि उर्फ छोटु बागडे याला न्यायालयाने दि. 28 मे 2021 पर्यंत पोलीस कोठडी रिमांडवर पाठविण्यात आले आहे. आरोपीला सोमवार, दि. 17 मे 2021 रोजी मा. श्री
व.भ.कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश क्र. 1 तथा अति. सत्र न्यायाधीश, विशेष न्यायालय जि. नागपूर
यांचे समक्ष पोलीस कोठडी रिमांड मिळण्यासाठी आरोपीचा चेहरा झाकुन हजर करण्यात आले होते. मा. न्यायालय यांचे समक्ष शासनातर्फे शासकिय अभियोक्ता श्री मदन सेनाड व आरोपीकडुन अॅड. श्री
चेतन ठाकुर यांनी युक्तीवाद केले. मा. न्यायालयाने तपासी अधिकारी व शासकिय अभियोक्ता तसेच आरोपीच्या वकिलांचे म्हणणे ऐकुन रवि उर्फ छोटु टिकाराम बागडे याचा 28 मे 2021 पर्यंत
पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला आहे.
अशी माहिती नागपुर पोलीसांनी दिली आहे.
सदर गुन्हयाचा तपास नागपूर शहराचे पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) श्री. सुनिल फुलारी यांचे निर्देशानुसार पोलीस उपायुक्त(डिटेक्शन)
श्री. गजानन शिवलिंग राजमाने यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त(गुन्हे) श्री.
भिमानंद नलावडे हे पो.हवा. दशरथ मिश्रा, प्रशांत लाडे, श्याम अंगुथलेवार, श्याम कडु, ना.पो.शि. प्रवीण गोरटे आणि संदीप मावलकर यांचे मदतीने करित आहेत.