नागपूर शहरात चार व्यक्तींनी केल्या आत्महत्या

May 03,2021

नागपूर : ३ मे - १५ आणि १७ वर्षाच्या दोन मुलींसह चौघांनी शहरातील विविध भागात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मानकापूर हद्दीत गोधनी रोड, वाघोबानगर येथे राहणार्या संस्कृता चंद्रशेखर सिंह (१५) हिने २४ एप्रिलला दुपारी ३ वाजताच्या सुमारास तिच्या राहत्या घरी सिलिंग फॅनला दुपट्टय़ाच्या सहाय्याने गळफास घेतला. तिला उपचारासाठी श्युअर टेक हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान  सकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. अजनी हद्दीत प्लॉट क्र.४0, चंद्रनगर येथे राहणार्या निधी राजेंद्र प्रसाद (१७) हिने २ मे ला पहाटे ५.३0 वाजताआधी गळफास घेऊन आत्महत्या केली. यशोधरानगर हद्दीत यादवनगर झोपडपट्टी नाल्याजवळ राहणार्या नेहाल शंकर नंदेश्वर (२५) याने २ मेला मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास त्याच्या राहत्या घरी छताच्या लोखंडी रॉडला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नंदनवन हद्दीत एल.आय.जी. क्वॉर्टर २४/७ येथे राहणार्या मयूर मनोहर लोहकरे (३0) याने ३0 एप्रिलला सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी हॉलमध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधीत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.