खुद्द मुख्यमंत्रीच सोने तस्करीत गुंतले असल्याचा केला आरोप

March 06,2021

तिरुअनंतपुरम, 6 मार्च : केरळ्याच्या सोने तस्करीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेखा हिने डीलरच्या चोरट्या तस्करीबद्दल सनसनाटी आरोप करीत मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे नाव गोवले आहे. तपास अधिकारी सीमा शुल्क आयुक्त सुमीत कुमार यांनी न्यायालयात ही माहिती दिली. विजयन यांच्या सांगण्यानुसार परकी चलनाची तस्करी केली होती, असे स्वप्नाने सांगितल्याचा दावा कुमार यांनी केला.

सुमीत कुमार उच्च न्यायालयात म्हणाले की, संयुकत अरब अमिरातीच्या माजी कौन्सिल जनरलबरोबर मुख्यमंत्री विजयमनयांचे निकटचे संबंध होते. असे अटकेत असलेल्या स्वप्ना सुरेश हिने सांगितले असून आर्थिक व्यवहारांबाबत आश्‍चर्यजनक खुलासे केले आहेत.

एनॉकुलममधील न्यायदंडाधिकार्‍यांसमोर तिच्या वतीने दिलेल्या गोपनीय माहितीत तिने विधानसभेचे अध्यक्ष श्रीरामकृष्णन यांच्यासह अन्य तीन कॅबिनेट मंत्र्यांचीही नावे घेतली. तेही परकी चलन तस्करीत सहभागी असल्याचा दावा तिने केला.