पाद्री आणि मौलवींविरोधात बोलण्याची महाविकास आघाडी सरकारची हिंमत आहे काय ः मंगलप्रसाद लोढा

March 06,2021

मुंबई 6 मार्च : मालाड मालवणमधील हिंदू अत्याचाराच्या मुद्यावरुन महाराष्ट्र विधानसभेत चांगलेच पडसाद उमटले आहेत. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी या विषयावरून सरकारला धारेवर धरले. या भागातून हिंदूंचे होत असलेले विस्थापन बघता हिंदू साधू संतांवर तोंडसुख घेणार्‍या महाविकास आघाडी सरकारमध्ये पाद्री आणि मौलवीविरोधात बोलायची हिमत आहे का, असा घणाघाती हल्ला त्यांनी सत्ताधार्‍यांना विचारला.

मालवणीत राहणार्‍या हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करीत ते सरकारवर चांगलेच बरसले. त्यांनी मालवणीतील गंभीर परिस्थिती पटवून देण्यासाठी मतदार यादीचा आधार घेतला. गेल्या पाच वर्षांच्या परिस्थितीचा विचार केला तर, मालवणीतील हिंदू मतदारांची संख्याही 15 हजारांनी कमी झाली आहे तर दुसर्‍या बाजूला मुस्लिम मतदारांची संख्या मात्र 12 हजारांनी वाढली आहे, असे ते म्हणाले. मालवणीतील छेडा कॉम्प्लेक्स या इमारतीत पाच वर्षांपूर्वी 108 कुटुंबे राहात होती. ती सारी कुटुंबे हिंदू होती. आजही छेडा कॉम्प्लेक्समध्ये 108 कुटुंबेच वास्तव्य करतात पण त्यातले फक्त 7 परिवार हिंदू राहिले असून बाकीचे 107 परिवार मुस्लिम आहेत. या परिसरात अनधिकृत मशिदी उभारण्यात आल्या आहेत.

परिसरातील चाळीत 56 दलित कुटुंबे राहात होश्रती. पण ाता तिथे फक्त 6 दलित कुटुंबे उरली आहेत. या कुटुंबांना अतोनात त्रास सहन करावा लागतो आहे. या परिसरात सार्वजनिक प्रसाधनगृह आहे. नमाजच्या वेळी कोणता व्यत्यय येऊ नये म्हणून, महिलांना या प्रसाधनगृहात कोंडण्यात येते. अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली. हे सर्व मालवणी पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवर आहेत, असेही ते म्हणाले.

भविष्यात जर मुंबईतला, महाराष्ट्रातला हिंदू अल्पसंख्यक झाला तर त्याची सुरुवात मालवणमधून होईल. पालघमरध्ये हिंदू साधूंची हत्या होते आणि महाराष्ट्र सरकारचा मंत्री साधूंना नालायक म्हणतो. हिंदू असून साधूंवर पातळी सोडून बोलणार्‍या महाविकास आघाडी सरकारमध्ये मौलवी आणि पाद्रीविरोधात हे बोलायची हिंमत आहे का, असा घणाघात त्यांनी केला.