भारतीय वायुदलात नवी ५ राफेल विमाने येणार

September 28,2020

नवी दिल्ली : २८ सप्टेंबर - चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर फ्रान्सने  आणखी पाच राफेल विमाने भारताच्या स्वाधीन केली आहेत. पुढील महिन्यात ही लढाऊ विमाने भारतात आणण्यात येणार असून, चीनच्या जे-20 लढाऊ  

सध्या ही विमाने फ‘ान्समध्येच आहेत. पुढील महिन्याच्या दुसर्या आठवड्यात ती भारतात आणली जातील, अशी माहिती फ‘ान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनी एका इंग‘जी वृत्तपत्राला दिली.

 ही विमाने पश्चिम बंगालमधील कलईकुंडा येथील वायुदलाच्या तळावर तैनात केले जाणार आहे. चीनला लागून असलेल्या पूर्वेकडील सीमेचे रक्षण ही विमाने करतील. राफेलच्या पहिल्या तुकडीतील 5 विमाने 10 सप्टेंबर रोजी औपचारिक कार्यक‘मात भारतीय हवाई दलात दाखल झाली होती.

 राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारताला सोपवण्यात आली आहे. ही विमाने सध्या फ‘ान्समध्ये आहेत. ही पाचही विमाने भारतात कधी आणायची, हे आता भारतीय वायुदलावर अवलंबून आहे. भारतीय वायुदलाचे वैमानिक उत्कृष्ट आहेत, असे लेनिन म्हणाले.

 चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पृष्ठभूमीवर या विमानांमध्ये भारताने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यामुळे ही विमाने कमी तापमानातही सहजपणे सुरू होऊ शकतात. पहिल्या तुकडीत भारतात दाखल झालेल्या 5 राफेल विमानांची 250 तासांहून अधिक उड्डाणे आणि त्यावरील शस्त्रास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या.