उपराजधानीत रुग्णसंख्या १० हजारांच्या पुढे, एकाच दिवशी ३८ मृत्यू

August 11,2020

नागपूर : ११ ऑगस्ट - राज्याच्या उपराजधानीत रोज मृत्यूचा आकडा वाढत असून आजतर ३८ रुग्णांचा मृत्यू झाला तर ९७७ रुग्ण बाधित निघाल्यामुळे शहराचा गेल्या ५ महिन्यातील सर्वाधिक रुग्णांचा रेकॉर्ड झाला आहे. आतातरी प्रशासनाने गंभीर पाऊले उचलायला हवी सर्वात कमी रुग्ण असलेले नागपूर शहर विक्रमी वाटचालीकडे गेले असून बाधित रुग्णांचा आकडा १०३६१ वर पोहोचला आहे. 

गेल्या ८ दिवसांपासून नागपुरात मृत्यूंची संख्या व बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंता वाढायला लागली आहे. राजकारण बाजूला ठेवून महापौर व आयुक्तांनी परत एकदा लॉक डाऊन करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया वैद्यकीय वर्तुळातून उठत आहे. नागरिकांनी गांभीर्य न घेतल्यामुळे मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. 

आज ३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात २६ शहरातील ९ ग्रामीण परिसरातील ३ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत. आतापर्यंत ३७२ मृत्यू झाले असून २५६ शहरातील ६४ ग्रामीणचे ५२ इतर जिल्ह्यातील आहेत. 

आज ९७७ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत त्यात ६६२ रुग्ण शहरातील आहेत तर ३१५ ग्रामीण भागातील आहेत हा आकडा १०३६१ वर पोहोचला आहे. आज १४६ रुग्ण बरे झाले असून ५०१५ रुग्ण आजपर्यंत कोरोनमुक्त झाले आहेत. ३४६२ रुग्णांवर उपचार सुरु असून त्यात २१८९ शहरातील तर ग्रामीणमध्ये २१७३ आहेत.  आज २२०० नमुने घेण्यात आले आहेत. ९७७ रुग्णांपैकी जीएमसी १०५, आयजीएमसी १४५,एम्स ५७, निरी ००, माफसू ००, खासगी ६१२, अँटीजेन ५८ अशी रुग्णांची संख्या आहे.