नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा ब्लास्ट २४ तासात १३९३ बाधित रुग्ण

March 05,2021

नागपूर : ५ मार्च - नागपूरसह विदर्भात कोरोनाचा ब्लास्ट झाला असून नागपूर जिल्ह्यात १३९३ तर पूर्व विदर्भात १८९७ रुग्ण २४ तासात बाधित झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर २४ तासात पूर्व विदर्भात १५ मृत्यूची नोंद झाली आहे. नागपूरसह विदर्भात आता संचाबन्दी लागण्याची वेळ आली असून शनिवार रविवार नागपूरच्या बाजारपेठा व कार्यालये बंद ठेवण्यात आले आहे. 

गेल्या ५ दिवसांपासून नागपुरात हजाराच्या संख्येत बाधित रुग्ण आढळत असतानाच २४ तासात १३९३ बाधित रुग्ण आढळले आहे.  त्यात ११७२ शहरातील २१९ ग्रामीण भागातील व २ इतर जिल्ह्यातील आहेत. बाधितांचा आकडा १५५२७५ वर पोहोचला आहे. नागपुरात २४ तासात ९ मृत्यू झाले असून ५ शहर २ ग्रामीण व २ इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण मृत्युसंख्या ४३७४ वर पोहोचली आहे. आज ५८३ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी रिकव्हरी रेट चे प्रमाण घसरले असून  ९६ टक्क्यावर रिकव्हरी रेट पोहोचला असताना आज ९०.४६ टक्क्यावर आला आहे. नागपूर शहरात १०४३२ रुग्णांवर उपचार सुरु असून ८५३७ शहरात १८९५ ग्रामीण भागाचा समावेश आहे. २४ तासात ११५०८ चाचण्या झाल्या असून शहरात ७६६० तर ग्रामीणमध्ये ३८४८ रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या.