विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या वर, नागपुरात १९५७ बाधित, ४८ मृत्यू

September 15,2020

नागपूर : १५ सप्टेंबर - राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा कहर सुरूच असून आज १९५७ बाधित रुग्ण आढळले असून ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर १६६६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. विदर्भात कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या वर पोहोचली आहे. आज १९५७ रुग्ण आढळले असून १७०५ रुग्ण शहरातील तर २४६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. एकूण बाधितांची संख्या ५५४३० वर पोहोचली आहे तर ४२३३३ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी गेलेले आहेत रिकव्हरी रेट ७६.३७ वर पोहोचला असला तरीही मृत्यूंची संख्या वाढत असल्यामुळे सध्या उपराजधानीत चिंतेची बाब मानण्यात येत आहे. आज ४८ रुग्णांचा मृत्यू झाला असून २९ शहरातील १३ ग्रामीण भागातील तर ६ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण मृत्युसंख्या १७५३ वर पोहोचली आहे. तर ११३४४ रुग्णांवर विविध रुग्णालाल्यात उपचार सुरु आहेत. त्यापैकी  ५७५७ गृह विलगिकरणात आहेत. त्यापैकी  ६८१० शहरातील तर ४५३४ ग्रामीणमधील रुग्णांचा समावेश आहे.