थोरात की पृथ्वीराज? नवा नेता कोण?महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक संपायला एक महिना झाला. ह्या निवडणुकीत काँग्रेस कुठेच दिसली नाही. शरद पवार काँग्रेस चालवत आहेत की काय? असे वाटत होते. काँग्रेस नव्हती; पण काँग्रेसचे काही नेते, कार्यकर्ते विरोधकांसाठी काम करताना दिसत होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतःहून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन टाकला हा त्यांचा मोठेपणा म्हटला पाहिजे; कारण महिना उलटला. विधानसभा निवडणुकीची धावपळ सुरू होईल; पण गद्दारांवर कारवाई करण्याची हिंमत महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या कर्त्याधर्त्यांना झाली नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर कारवाई करू, अशी परवा बातमी आली. कधी कधी प्रश्न पडतो की, काँग्रेसला झाले आहे तरी काय? लकवा मारला? भाजपच्या विरोधात सर्वांना एकजूट करण्याची भाषा काही महिने आधी हे नेते करत होते. एकजूट तर सोडा, हे आपले घरही सांभाळू शकले नाहीत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण  च्या गडात आमदार बंडखोरी करतो? काय सांभाळता तुम्ही पक्ष? निकालानंतर तुमची कारवाई पाहायला बंडखोर तुमच्या पक्षात असायला हवेत ना? खरे तर अशोक चव्हाण यांनीच स्वतःहून बाजूला व्हायला पाहिजे; पण ह्यांना ओसाड गावची पाटिलकीही सोडवत नाही. काँग्रेस आधीही गलितगात्र होती. आता तर ती आयसीयूमध्ये गेलेली दिसते.

लोकसभा निवडणुकीचे निकाल कसे लागतील त्याचा अजूनही अंदाज येत नाही. जे काही लागतील ते धक्कादायक असतील हे मात्र पक्के. त्या आधी काँग्रेसचा काही तरी निकाल लावायला हवा. नाही तर लोक आहेतच. राज्य दुष्काळातून जात आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी शरद पवार दुष्काळी भागात फिरत आहेत. काँग्रेसचे नेते कुठे लपले आहेत? विधानसभेतील विरोधी नेताच नाही. सरकारवर कसा वचक ठेवणार? विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होईपर्यंत पावसाळा सुरू झालेला असेल. विरोधी नेता म्हणजे उद्या सत्ता आली तर मुख्यमंत्रिपदाचा दावेदार. म्हणून त्यासाठी आधीच भांडणे. विखे पाटील यांनी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले आहेत. त्यांची जागा लगेच भरली पाहिजे. विखेंचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी एकाकडे पक्षाची धुरा ताबडतोबीने दिली पाहिजे. अशोक चव्हाण थकले आहेत. त्यांनाही नारळ द्या. मोदी १६ तास काम करत आहेत. तुम्ही सहा तास काम करणारा तर माणूस द्या. राज्य दुष्काळात होरपळून निघत असताना काँग्रेसला आज मायबाप नाही. लोकांनी पुन्हा मोदींकडे जावे अशी काँग्रेसचीच इच्छा असेल तर प्रश्नच संपला.add like button Service und Garantie

Leave Your Comments

Other News Today

Video Of The Week