नागपूरला सायकलची राजधानी बनवण्याची योजना

August 05,2020

नागपूर : ५ ऑगस्ट : केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या तर्फे "इंडीया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज"  हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश सायकल आणि सायकलिंगला प्रोत्साहन देणे आहे.  नागपूर स्मार्ट एंड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्या सहाकार्याने नागपूर शहराला Bicycle Capital of India  बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचा शुभारंभ उद्या  दि. ६ ऑगस्ट, २०२० ला सकाळी ७.०० वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय भवन, सिव्हील लाईन्स येथून करण्यात येईल. या कार्यक्रमाला  महापौर संदीप जोशी,  स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके, मनपा आयुक्त  तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी  रविंद्र ठाकरे,  पोलिस आयुक्त  भूषणकुमार उपाध्याय आणि मनपाचे अतिरिक्त आयुक्त  जलज शर्मा उपस्थित राहतील.