अकोल्यात जुगार अड्ड्यावर छापा, १९ व्यक्तींविरुद्ध गुन्हा

July 13,2020

अकोला : १३ जुलै - पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अकोट उपविभागात सुरू असलेल्या चंदनपूर या गावातील जुगार अड्ड्यावर रविवारी  सायंकाळी छापा टाकण्यात आला. याप्रकरणी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक जण हा पळून गेला आहे. 

या पथकाने 2 लाख 79 हजार 870 रुपये रोख रक्कम, सुमारे 28 लाख रुपये किंमतीचे तीन चारचाकी ्वाहने, 3 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाक्या, एक लाख 21 हजार रुपयांचे मोबाईल, असा एकूण 35 लाख 30 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने अवैधव्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

अकोट उपविभागात गस्त घालत असताना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाला चंदनपूर या गावात युसुफ खान मुजफ्फर खान याच्याकडे जुगाराचा मोठा डाव सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने छापा टाकला. या प्रकरणी अजय गावंडे, अनुराग अग्रवाल, गोपाळ इंगळे, युसुफ खान मुजफ्फर खान, सय्यद फारुख सय्यद मुजफ्फर, शेख रशीद शेख युसुफ, संतोष गिरी, भास्कर मानकर, हरीश मलीये, शेख सादिक उर्फ अब्दुल सादिक शेख सलाम, सिद्धार्थ वानखडे, कैलास दुबे, राजेश चोपडे, सतीश झगळे, निसार शाह हुसेन शाह, नसीर खान बसिर खान, अन्वर अली हशरत अली, शकिर शाह इब्राहिम शाह यांना अटक केली तर संदीप खारोडे हा पळून झाला. विशेष पथकाची आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जातत आहे. पथकाकडून ग्रामीण भागात कारवाई सुरू असली तरी शहरी भागातील अवैध व्यवसायिकांवर योग्य कारवाई आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.