अखेर रस्त्याच्या कडेला भराव टाकण्याचा कामाला सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल; शिवसेनेचा मागणीला यश

July 09,2020

तुमसर : ९जुलै -  गेल्या नऊ महिन्यापासून मुक्ताबाई शाळा ते नांगी चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम अपूर्ण होते. परिणामी नागरिकांच्या रहदारीला अडचण निर्माण होत होती. सदर रस्त्याच्या धोकादायक कडाबाबत शिवसेनेने दि. ६ जुलै सोमवार रोजी आवाज उठविला होता. त्यानंतर निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या इशाऱ्याची दखल घेत अखेर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या कामाला दोन दिवसात अर्थातच दि. ८ जुलै बुधवारी रोजी सुरुवात करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेकडून नियोजित आंदोलन स्थगित करण्याचे जाहीर करण्यात आले. तसेच शिवसेनेचा वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता डि. एल. शुक्ला साहेबांसह प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, विभाग प्रमुख वामनराव पडोळे, शाखा प्रमुख मनोहर गायधने उपस्थित होते.