चंद्रपूर जिल्ह्यात तीन तलाकचा गुन्हा दाखल

July 09,2020

चंद्रपूर : ९जुलै - मुस्लीम महिलांवर तीन तलाक प्रथा फारच अन्यायकारक होती. यासाठे तीन तलाक विरोधी कायदा मंजूर झाल्यानंतर तीन तलाक प्रथाच बंद झाली होती. गुन्हा दाखल होईल या भीतीने मुस्लीम समाजातील अनेक परिवार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले होते. मात्र तरीही काहींना कायद्याची भीती राहिलेली नाही. असाच प्रकार वरोरा तालुक्यात घडला जामीन अली या व्यक्तीने आपल्या पत्नीला तीन तलाक म्हणत घटस्पोट दिला. मात्र, पीडित नजमाने याविरोधात आवाज उचलत थेट वरोरा पोलिस ठाणे गाठून पतीविरुध्द गुन्हा दाखल केला. तीन तलाकचा विदर्भातील हा पहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जाते. 

प्राप्त माहितीनुसार, पीडित नजमा हिचा विवाह जामीन अली या व्यक्ती सोबत १२ फेब्रुवारी २0१५ रोजी मुस्लीम रीतीरिवाजानुसार पार पडला. लग्नानंतर नजमाला जामीन अलीपासून दोन अपत्य मुली जन्माला आल्या. लग्नानंतर नजमाचे पती व सासरचे तिला हुंड्यासाठी त्रास देत होते, तीन तोळे सोने माहेरून आणावे म्हणून तिच्यावर दबाव टाकला जात होता. मात्र नजमा चिमुकल्या मुलींखातर जामीनशी संसाराचा गाळा ओढत होती. जानेवारी २0२0 मध्ये नजमाची प्रकृ ती खराब झाल्याने ती माहेरी गेली. त्यानंतर मार्च २0२0 नजमा सासरी परत आली. मात्र पतीने तिला घरात न घेता लाथा बुक्यानी मारहाण केली आणी घरुन हाकलून लावले. यानंतर नजमा तिच्या लग्नानाचे मध्यस्त ताहीर अली रा. पुसद जिल्हा, यवतमाळ याच्याकडे काही दिवस मुलींसह राहीली. अखेर नजमाच्या काकांनी तिला वरोरा येथे परत आणले. नजमाचा पती तेव्हापासून तिचेवर तलाक देण्यासाठी दबाव टाकत होता.मात्र नजमा तलाक देण्यास तयार नव्हती. दरम्यान पोस्टाच्या लिफाफ्यात १00 रु. च्या स्टॅम पेपरवर पती जामीन ईरानी यांनी तिला तलाक नामा लिहुन पाठविला. तलाकनामा बघताच नजमाला मानसिक आघात बसला. तलाकनाम्यासोबत एक तसदिक नामासुद्धा मौलानाच्या सहीने जोडला आहे . सोबतच अँड ए.ए. खान यांनी पहिला तलाक दिल्याबद्दल नोटिस सुद्धा जोडले होते. नजमाच्या गैरहजेरीत आणी संमतीशिवाय एकतर्फा तलाकनामा तिला पाठवल्याने नजमाने वरोरा पोलिस स्टेशनमध्ये पती जामीन अली याच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. वरोरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.