पोहताना बुडून मृत्यू

July 09,2020

चंद्रपूर :९जुलै -  चिमूर नगर परिषद अंतर्गत वडाळा पैकू येथे मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका १0 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजताच्यादरम्यान उघडकीस आली. सोहेल गिरीधर चौधरी असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोहेल हा आपल्या इतर चार मित्रांसोबत गावालगतच्या बोळीत पोहायला गेला. बोळीच्या पाण्यात उडी घेतल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने सोहेल पाण्यात गटांगळ्या खात होता. मदतीसाठी तो मित्रांना आवाज देत होता. मात्र त्याचे सर्व मित्र भीतीपोटी गावाकडे पळून गेले. मदत न मिळाल्याने बोळीच्या पाण्यात बुडून सोहेलचा मृत्यू झाला. मित्रांनी याबाबत माहिती दिली.