कोविड १९ - नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांची एकुन संख्या २९

July 08,2020

नागपूर : कोरोना चे रुग्ण दिवसे नी दिवस शहरात वाढत आहेत. काल रात्री १०.०० च्या सुमारास मेयो येथे उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. माहिती प्रामाने मृतक व्यक्ति ७१ वर्षीय पुरुष अमरावती येथील रहिवासी होता. ह्रदयाच्या अन्य आजाराने ग्रसित या रुग्णाच्या कोविड चाचणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. या नंतर अवघ्या २ तासानंतरच रात्री उशिरा १२.०५ वाजता पुन्हा एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. हा मृतक ६८ वर्षीय पुरुष असुन मध्य प्रदेशच्या सिवनी तालुक्यातील रहिवासी होता. ह्रदयाच्या अन्य आजाराने ग्रसित या ही रुग्णावर मेयो येथे उपचार सुरू होता. कोविड चाचणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. सध्या नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित झालेल्या मृतांची संख्या २९ झाली आहे.