अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल : ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 15 पासून सुरू

July 08,2020

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम 1 जुलैपासून जाहीर केला.  15 जुलै पासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्जाचा ;भाग.1  भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.  यावर्षी प्रवेशाच्या नियमात थोडा बदल केला आहे.  पहिले या पहिले मिळवा योजनेत बदल केला आहे 
15 जुलैपर्यंत शाळा  महाविद्यालयांना नोंदणी करायची आहे. नोंदणी करणाऱ्या ज्युनिअर कॉलेजला प्रवेश प्रक्रियेत सहभागी करण्यात येणार आहे.  यावर्षी समिती विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नियम व कार्यप्रणालीची माहिती देणारी सूचना पुस्तिका यंदा देणार नाही. आयडी व पासवर्ड यासाठी विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन किटसुद्धा मिळणार नाही.  विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया ऑनलाईन करायची आहे.  समितीच्या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना आयडी व पासवर्ड ऑनलाईन देण्यात येईल. विद्यार्थ्यांना फीसुद्धा ऑनलाईन भरायची आहे.  ;भाग.1 फॉर्म भरल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचा अर्धा टप्पा पूर्ण होईल.  नंतरचा टप्पा दहावीचा निकाल लागल्यानंतरचा आहेण् निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज ; भाग.2  भरणे सुरू होणार आहे.

तीन टप्प्यात संपणार प्रक्रिया
सूत्रांच्या सांगण्यानुसार यावेळी प्रवेश प्रक्रिया तीन राऊंडमध्ये संपणार आहे. या तीनही राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईलण् कोरोनामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया एक महिना उशिरा सुरू झाली आहे. जर प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू ठेवल्यास विद्यार्थ्यांचे 180 दिवसांचे सत्र पूर्ण होणार नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियात काही बदल केले आहे.  गेल्या वर्षी पाच ते सहा राऊंड झाल्यानंतर जागा रिक्त राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला होता.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी केंद्र देणे सुरू
केंद्रीय प्रवेश समितीद्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत यंदा काही बदल केले आहेत. शिवाय यंदा माहिती पुस्तिकासुद्धा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाळा. महाविद्यालयस्तरावर केंद्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे . ज्या शाळा.  महाविद्यालयाला मार्गदर्शन केंद्र हवे आहे.  त्यांनी शिक्षण उपसंचालक अथवा केंद्र प्रवेश समितीच्या अध्यक्षाच्या नावाने अर्ज करायचा आहे.