अमेरिकेतील 100 व्हेटिलेटर पुढच्या आठवड्यात

June 04,2020

वॉशिंग्टन, 4 जून - कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अमेरिकेकडून दिले जाणारी 100 व्हेंटिलेटर पुढील आठवड्यामध्ये भारताकडे दिले जातील, अशी माहिती व्हाइट हाऊस कडून देण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरध्वनीवरील संभाषणामध्ये ट्रम्प यांनी मोदींना याबाबत माहिती दिल्याचेही व्हाइट हाऊसच्या प्रवकत्यांनी म्हटले आहे. ट्रम्प आणि मोदी या दोन्ही नेत्यांदमर्‍यान जी- 7 च्या एकूण स्वरुपाबाबतही चर्चा झाली, तसेच  सुरक्षेच्या मुद्यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोनाविरुद्ध लढ्यामध्ये महत्त्वाचे ठरणारे 100 व्हेंटिलेटर पुढील आठवड्यात भारतात पोहोचतील. कोरोनाचा फटका बसलेल्या देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, स्पेन आणि इटली या देशानंतर भारताचा क्रमांक आहे. दोन लाखापेक्षा जास्त जणांना भारतात कोरोनाची लागण झाली असून, साडेपाच हजारांच्यावर कोरोनाचे बळी गेले आहेत. कोरोीेनाचा फटका बसल्यानंतर त्यातून बचावासाठी व्हेटिंलेटर महत्त्वाचे ठरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या  आकडेवारीनुसार कोरोनामुळे गंभीर असलेल्या पेशंटमधील दर पाच पेशंटपैकी एकाला व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. व्हेंटिलेटरमुळे पेशंटची श्‍वसनक्रिया सुरळीत होते आणि त्याच्या शरीराला असलेला धोकाही टळतो. त्यामुळे असे  व्हेंटिलेटर कोरोनाबाधित देशांसाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताने व्हेंटिलेटरची आवश्यकता वारंवार अधोरेखित केली आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर भारताला अमेरिकने व्हेंटिलेटर देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार 100 व्हेंटिलेटर भारतात येणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प  यांनी पंतप्रधान मोदींनी या वर्षाच्या अखेरीस होणार्‍या जी-7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. डोनाल्ड ट्रम्प यांचा जी-7 देशांच्या संघटनेचा विस्तार करायचा आहे. त्या दृष्टीने ट्रम्प यांनी उचलले हे पाऊल आहे.