केरळातील हत्तीणीचा मृत्यू, जनतेत संताप

June 04,2020

कोची, 4 जून - केरळमध्ये एका गर्भार हत्तिणीच्या भीषण हत्येचा सर्वत्र निषेध होत असतानाच कोल्लम जिल्ह्यातही एक तरुण हत्तीण महिनाभरापूर्वी तोंडातील जखमांमुळे मरण पावल्याची अशीच एक घटना उघडकीला आली आहे.

सायलेंट व्हॅली अभयारण्यात 27 मे रोजी झालेल्या घटनेत, एका इसमाने शक्तीशाली फटाके भरलेला अननस एका गर्भार हत्तीणीला खायला दिला. तिने हा अननस चावण्याचा प्रयत्न केला असता तिच्या तोंडातच त्याचा स्फोट होऊन तिचा मृत्यू झाला. कोल्लम जिल्ह्याच्या पुनालूर भागातील पटाणपुरम वन क्षेत्रात एप्रिलमध्ये झालेल्या घटनेत आणखी एका हत्तीणीवर असाच प्रसंग ओढवला होता, असे वन खात्याच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांमगितले. वन क्षेत्राच्या सीमेवरील भागात वन खात्याच्या अधिकार्‍यांना ही हत्तीण गंभीर जखमी अवस्थेत आढळी. ती तिच्या कळापापासून वेगली झाली होती आणि तिला खाता येत नव्हते. ती अतिशय अशक्त होती, असे हा अधिकारी म्हणाला.

वर खात्याचे अधिकारी व कर्मचारी या हत्तीणीजवळ गेले, तेव्हा ती जंगलात पळाली आणि तिची वाट पाहणार्‍या कळपात सामील झाली होती. मात्र दुसर्‍या दिवशी ती पुन्हा कळपापासून वेगळी झालेली आढळली. तिच्यावर योग्य ते उपचार  करण्यात आले, मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.