सावत्र आई व तिच्या प्रियकराने केला मुलाचा गेम

August 11,2020

नागपूर : ११ ऑगस्ट - अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने मुलाचा सावत्र आई व तिच्या प्रियकराने खून केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील मोझर या गावी घडली. कमलेश चव्हाण असे ममृतकाचे नाव असून पोलिसांनी आई व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 

कमलेश चव्हाण याचा मृतदेह ४ ऑगस्ट रोजी मोझरच्या स्मशानभूमीनीत सापडला होता. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली हे स्पष्ट झाले होते, मात्र ही  हत्या कुणी केली याचा शोध लागत नव्हता. उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंग चंदेल व त्यांच्या चमूने याप्रकरणाचा छडा  लावून कमलेशची आई व तिच्या प्रियकराने हा खून केल्याचा तपासात स्पष्ट आले. सावत्र आई शोभा चव्हाण व तिचा प्रियकर नरेंद्र ढेंगाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. कमलेशला दोघांचे संबंध पटत नव्हते त्यातूनच त्यांचा वाद व्हायचा. ३ ऑगस्टला कमलेशला खूप मारहाण केली. अर्धमेला झाला असताना ढेंगालेने त्याला स्मशानात आणले तेथे फुटलेल्या काचेच्या बॉटलने वार  करून ठार केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे.