अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू

August 11,2020

वाशीम : ११ ऑगस्ट - मेडिकलवर औषधी आणायला जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू  झाला. ही घटना घटना ८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास डोणगावच्या कणका  परिसरात घडली. मेहकर तालुक्यातील कणका येथील शालिकराम त्र्यंबक बोरुडे  (२३) व वेदांत अमोल धोकड (१३) हे दोघे शनिवारी शेलगाव देशमुख येथे मेडिकलवर औषधी आणण्याकरवीत दुचाकी क्र. एमएच २८ पी ६३९८ ने जात असताना कणका परिसरातील आखाडे  यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.