ग्रीन हायवेला लागून हायस्पीड रेल्वे गाडी सुरू करणार : नितीन गडकरी

August 08,2020

मुंबई, 8 ऑगस्ट : देशात उभारण्यात येत, असलेल्या 22 ग्रीन हायवेजला लागून हायस्पीड ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयाला दिला असून त्यात दिल्ली, मुंबई, नागपूर हायस्पीड ट्रेनचा समावेश आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल ही माहिती दिली. मध्यंतरी मी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीची बैठक घेतली. त्यात रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना प्रस्ताव दिला. त्यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे गडकरी म्हणाले.

ग्रीन हायपेजसाठी आम्ही आधीच भूसंपाीदन करीत आहोत. त्यामुळे हायस्पीड ट्रेन वा अन्य सुविधांसाठी वेगळे भूसंपादन करावे लागणार नाही आणि पैेशांचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल असे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचा हा उपक्रम असेल. रस्ते व रेल्वे वाहतुकीचा हा एक महत्त्वाकांक्षी एकात्मिक विकास प्रकल्प असेल रेल्वेशी समन्वय साधण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने चार अधिकार्‍यांची एक समिती नियुक्त केली आहे. बुलेट ट्रेनचा व ेग सुरुवातीला 300 किमी प्रति तास इतका असेल. या सात मार्गासाठीची ब्ल्यू प्रिंट ही4 भारतीय रेल्वेकडून सध्या तयार केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.