आता वेळ काशी आणि मथुरेला मुक्त करण्याची : महंत नरेंद्र गिरी

August 08,2020

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : जर पाकिस्तान हा मुस्लिम देश असेल तर भारत हिंदूंचा देश का होऊ शकत नाही? असा प्रश्‍न आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी विचारला आहे. इतकेच नव्हे तर अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीमुक्तीची लढढ्ाई आता संपुष्टात आली आहे. आता काशी आणि मधुरेला मुक्त करण्याची वेळ आली आहे. अशा सूचक शब्दात त्यांनी आपली भविष्यातील वाटचाल बोलून दाखवली. अयोध्येतील श्रीराममंदिर भूमिपूजन सोहळ्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी वरीलप्रमाणे वक्तव्य केले.

हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असुद्दीन ओवैसि यांच्या विधानाचा समाचार घेताना महंत नरेंद्र गिरी यांनी हे विधान केले. खरे म्हणजे भारत हा हिंदूंचाच देश आहे. परंतु इथे सर्व धर्माचा सन्मान केला जातो्, असेही म्हणाले.

इतर धर्माचे आचरण करणार्‍यांचाही आम्ही सनातनी सन्मान करतो. त्यांची गळाभेट घेतो. त्यांच्याविषयी आस्था राखथो. परंतु जेव्हा कुणी आमच्या धर्माला आव्हान देतो आणि अपमानजनक शब्दांचा उच्चार करतो तेव्हा आम्ही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहमीच तयार असतो. असेही त्यांनी रोखठोक शब्दात बजावले. राममंदिराची उभारणी संविधानाच्या कक्षेत राहून तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि श्रीराम मंदिर ट्रस्टच्या आमंत्रणानंतरच अयोध्येला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केले. रामजन्मभूमिमुक्तीसाठी हिंदूंनी शेकडो वर्षे संघर्ष केला व नंतर न्यायालयाच्या निर्णयाचीही प्रतीक्षा केली. असे म्हणत गिरी यांनी पंतप्रधान मोदींच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याच्या निर्णयाचे कौतुक केले.