राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाअधिवेशन 7 ला नागपुरात

August 05,2020

नागपूर : ५ ऑगस्ट - राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दरवर्षी होणारे महाअधिवेशन यावर्षी 5 वे अधिवेशन कोरोनामुळे 7 ऑगष्ट  2020 रोजी सायंकाळी 6 ते 9 या दरम्यान ऑनलाईन  होणार आहे .

या अधिवेशनाचे उदघाटन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष  ना . नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते होणार असुन मुख्य अतिथी म्हणुन तेजस्वी यादव माजी उपमुख्यमंत्री बिहार राज्य व ना. विजय वडेट्टीवार ओबीसी बहुजन कल्यान मंत्री महाराष्ट्र हे राहणार आहेत . तसेच वक्ता म्हणुन  पी. नरहरी IAS आयुक्त व सचिव मध्यप्रदेश व डॉ. आर. एस. प्रविणकुमार IPS सचिव तेलंगाना राज्य हे मार्गदर्शन करणार आहेत. जस्टीस व्ही. एश्वर्या अध्यक्ष उच्च शिक्षण आयोग आंध्रप्रदेश हे विशेष अतिथी म्हणुन मार्गदर्शन करणार आहेत . डॉ . हरी एपन्नापल्ली अध्यक्ष लिड इंडिया ( USA ) व डॉ. बबनराव तायवाडे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ उदघाटनीय मार्गदर्शन करणार आहेत . या अधिवेशनात ओबीसी समाजाच्या खालील समस्या तथा मागण्यावर विचार विनिमय करण्यात येणार आहे .