अर्णब गोस्वामी विरुद्ध नागपुरात पोलीस तक्रार

August 05,2020

नागपूर : ५ ऑगस्ट - पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अपमानजनक भाषेचा वापर करून सरकार पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे फॅन्स क्लब तर्फे निषेध नोंदविण्यात आला. पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करून त्यांच्या चॅनलविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी एका तक्रारीतून मुख्यमंत्री उद्धव साहेब फॅन्स क्लब चे संयोजक  रविनिश पांडे उर्फ चिंटू महाराज तर्फे कळमना  पोलिसांकडे करण्यात आली

प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे. उद्धव ठाकरे फॅन्स क्लबचे रवनिश पांडे यांनी कळमना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रिपब्लिकन भारत या चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानजनक भाषेचा वापर केला. पत्रकार गोस्वामी यांनी या माध्यमातून सरकार पाडण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

गोस्वामी यांचे हे वक्तव्य आणि कृती निषेधार्ह असून ते समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण गढूळ होत असून सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पत्रकार अर्णाब गोस्वामी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करा. त्यांच्या चैनलवरही बंदी घालावी, अशी मागणी रवनीश पांडे यांनी तक्रारीतून केली आहे.