काश्मीर प्रकरणी पाकिस्तानने जारी केले टपाल तिकीट

August 05,2020

इस्लामाबाद : ५ ऑगस्ट - कलम 370 निष्प्रभ करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला आज  5 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या संपूर्ण काळात तडफडत असलेल्या पाकिस्तानने आपली खदखद व्यक्त करणारे एक टपाल तिकीट सोमवारी जारी केले. या तिकिटात संपूर्ण जम्मू-काश्मीर आपल्याच मालकीचे असल्याचे दाखवले आहे.

 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय कसा बेकायदेशीर होता, मोदी म्हणजे आजचे हिटलरच आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न पाकिस्तान सरकारने यातून केला आहे. ज्या जम्मू-काश्मीरचा विशेष हक्क भारताने हिरावला आहे, ते आमचेच होते. भारतीय लष्कर आता तिथे मानवीहक्कांचे उल्लंघन करीत आहे, असा जळफळाट करताना, काश्मिरी जनतेवर आमचे भरपूर प्रेम आहे, असा दावा या कार्यक्रमात उपस्थित असलेले पाकिस्तानचे दूरसंचार आणि टपालसेवा मंत्री मुराद सईद यांनी केला.

 हिंदुत्व विचारसरणी अतिशय धोकादायक आहे, असा इशारा पंतप्रधान इम्रान खान यांनी आधीच दिला आहे. यामुळे फक्त काश्मिरींनाच नव्हे तर, भारतात राहणार्या अल्पसंख्यकांना देखील धोका आहे, असेही ते यावेळी म्हणाले.