लोकसेवा आयोग निकाल - नागपूरच्या ६ विद्यार्थ्यांनी मारली बाजी

August 05,2020

नागपूर : ५ ऑगस्ट - संघ लोकसेवा आयोगातर्फे आयोजित नागरी सेवा परीक्षेचा २०१९ सत्राचा अंतिम निकाल नुकताच घोषित करण्यात आला. त्यात नागपूरच्या शासकीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेतील सहा विद्याथ्र्यांनी निकालात बाजी मारली असून त्यात चंद्रपूरचा सुमीत रामटेके (७४८), निखिल दुबे (७३३), चंद्रपूरची प्रज्ञा खंदारे (७१९), पुण्याचा प्रसाद शिंदे  (२८७), नाशिक येथील अशित कांबळे (६५१) व स्वरुप दीक्षित (८२७) या मानांकनानुसार अव्वल ठरले आहेत.

नागपूर शहरातील जुने मॉरीस कॉलेज परिसरातील प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातून मागीलवर्षी १२० विद्याथ्र्यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर ४२ विद्याथ्र्यांनी पूर्व परीक्षेत (प्रिलिम्स) यश मिळवून मुख्य परीक्षा दिली. त्यातील १७ विद्याथ्र्यांची मुलाखतीसाठी पात्र ठरले आणि आज घोषित निकालात अंतिमत: सहा विद्याथ्र्यांनी घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती संचालक प्रमोद लाखे यांनी दिली.

या विद्याथ्र्यांना मुलाखतीचे तंत्र अवगत व्हावे या हेतून दिल्ली येथील महाराष्ट्र भवनात मुलाखत सत्र आयोजित करण्यात येते. यावेळी त्यात १०३ विद्याथ्र्यांनी सहभाग नोंंदविला. त्यातील ४० विद्यार्थी अंतिम यादीत चमकले. या मुलाखत  सत्रात सहभागी झालेली नेहा भोसले राज्यातून प्रथम असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावर्षी राज्यातून ९० हून अधिक विद्यार्थी अंतिम परीक्षा उत्तीर्ण होतील असा अंदाज आहे.

महाराष्ट्रातील विविध नागरी सेवा प्रशिक्षण केंद्रात नोंदणी केलेल्या एकूण ८२९ उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यातील अभिषेक सराफ राज्यातून प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाला असून संघ लोकसेवा आयोगाने आज घोषित केलेल्या अंतिम यादीत ८२९ विद्याथ्र्यांची निवड झाल्याचे म्हटले आहे. त्यातील ११ विद्याथ्र्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. यावर्षी प्रथमत: आर्थिक दुर्बल घटकातून ७८ विद्याथ्र्यांची निवड झाल्याचेही म्हटले आहे.

निकाल घोषित झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांशी  संपर्क साधला असता, बहुतांश विद्यार्थी दिल्ली येथे असल्याचे लक्षात आले. त्यातील सुमीत रामटेके याला निकालासंदर्भात विचारले असता, विदर्भात जागृती होण्याची गरज आहे. दुसरे म्हणजे मार्गदर्शनाच्या योग्य संधी उपलब्ध होण्याची गरज असल्याचे सुमीतने सांगितले. मागील चार वर्षापासून तो या परीक्षेचा अभ्यास करीत आहे. २०१५ साली त्याने वाराणसी आयआयटी येथून अभियांत्रिकी पदवी घेतली. तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूरचा असून त्याचे उच्च माध्यमिक शिक्षण नागपुरात झाले. २०१८ साली त्याला सीआरपीएफ मध्ये असि. कमांडंट म्हणून पोस्टींग मिळाले, पण त्याने तो स्वीकारले नाही. यावर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि उत्कृष्ठ मानांकनासह परीक्षा उत्तीर्ण केली.