बाबरी मशीद राहिलच - ओवैसी

August 05,2020

मुंबई : ५ ऑगस्ट - अयोध्येत राम मंदिराचे  भूमिपूजन पार पडत असतानाच एमआयएमचे खासदार असदउद्दीन ओवेसी यांनी विरोधात भूमिका घेतली आहे. 

असदउद्दीन ओवेसी यांनी राम मंदिर भूमिपूजनानिमित्ताने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी 'बाबरी मशीद ही तेव्हाही होती, आजही आणि पुढेही राहील' असं मत व्यक्त केले आहे.

ओवेसी यांनी या ट्वीटसोबत जुन्या बाबरी मशिदीचा आणि बाबरी मशीद पाडण्याचा फोटोही ट्वीट केला आहे.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाण्यावर प्रश्न उपस्थितीत केला होता. पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीने मंदिराच्या भूमिपूजनला जाणे हे त्यांनी घेतलेल्या शपथेचं उल्लंघन आहे, अशी भूमिका मांडली होती. त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून अयोध्येच्या सोहळ्याला जात आहे की, वैयक्तिक कारण आहे, हे ही त्यांनी स्पष्ट करावे अशी मागणीही ओवेसींनी केली होती.