आजचा ऐतिहासिक दिवस - लालकृष्ण अडवाणी

August 05,2020

नवी दिल्ली: ५ऑगस्ट - उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिर भूमीपूजन सोहळा आज पार पडला. 1990 च्या दशकात सुरू झालेल्या राम मंदिर चळवळीतील आघाडीचे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आनंद व्यक्त केला आहे. मंदिराचे भूमिपूजन हे माझ्या हृदयाजवळ असलेले एक स्वप्न आज पूर्ण होत आहे. सर्व भारतीयांसाठी हा ऐतिहासिक आणि भावनिक दिवस आहे, असे अडवाणी म्हणाले. 

भगवान रामचे सद्गुण आत्मसात करण्यासाठी हे मंदिर सर्व भारतीयांना प्रेरणा देईल. माझा विश्वास आहे की, राम मंदिर सर्वांना न्याय मिळवून देणारे मजबूत, संपन्न, शांततापूर्ण आणि सुसंवादी राष्ट्र म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करेल. कोणाकडेही दुर्लक्ष किंवा द्वेष केला जाणार नाही. जेणेकरून आपण रामराज्यातील खरोखर सुशासनाचे प्रतीक होऊ शकू, असे मत अडवाणी यांनी व्यक्त केले. 

कधीकधी महत्वपूर्ण स्वप्नांच्या पूर्ततेसाठी बराच वेळ लागतो. परंतु, जेव्हा ती शेवटी पूर्ण होतात, तेव्हा केलेली प्रतीक्षा सार्थक ठरते. आज पंतप्रधान मोदी राम मंदिराचा पाया घालत आहेत. हा केवळ माझ्यासाठीच नाही, तर सर्व भारतीयांसाठी ऐतिहासिक आणि भावनिक दिवस आहे, असे अडवाणी म्हणाले.

रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये भगवान रामाचे भव्य मंदिर उभारण्याची भाजपाची इच्छा आणि मिशन होते. श्री राम मंदिर मजबूत समृद्ध म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करेल. श्री राम यांनी भारत आणि तेथील जनतेला सदैव आशीर्वाद द्यावे. जय श्री राम, असे अडवाणी म्हणाले. 

या शुभ प्रसंगी, रामजन्मभूमी चळवळीसाठी मोलाचे योगदान आणि बलिदान देणार्या संत, नेते आणि लोकांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छित आहे. मंदिरामुळे भारतीयांमधील संबंध दृढ होण्यास बरीच प्रगती होईल. श्री. राम यांना भारताच्या सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या परंपरेत एक प्रतिष्ठित स्थान आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राम मंदिराचे बांधकाम शांततेच्या वातावरणात सुरू आहे, असे आडवाणी म्हणाले.