अकोला जिल्ह्यात दर रविवारी राहणार कडक संचारबंदी

August 02,2020

अकोला : २ ऑगस्ट - अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणूची व्याप्ती लक्षात घेता, ३१ ऑगस्टपर्यन्त संचारबंदी वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मिशन बिगेन अंतर्गत दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार अकोला शहरासह ग्रामीण भागात ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहणार असून ऑगस्ट महिन्याच्या प्रत्येक रविवारी कडक संचारबंदी लागू राहणार आहे. दरम्यान बाजारपेठ, दुकाने, भाजीपाला, पेट्रोलपम्प, सलून, बँक आदी सर्व बाबतीत यापूर्वी लागू असलेले आदेश ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत. 

यापूर्वीच्या आदेशानुसार निर्बंधांमध्ये देण्यात आलेली सुलभता व टप्पानिहाय लॉक डाऊन उघडण्याबाबतचे आदेश कायम ठेवून सुधारित आदेश संपूर्ण अकोला शहर तसेच ग्रामीण क्षेत्राकरिता लागू राहणार आहेत. दुकाने सम आणि विषम तारखांना सुरु ठेवण्याबाबतचा आदेश मात्र रद्द करण्यात आला आहे.