वाशीममध्ये रेशनचा तांदूळ पकडला

August 01,2020

वाशीम : १ ऑगस्ट - संपूर्ण विदर्भातून शासनाच्या धान्य वितरण प्रणाली मध्ये भ्रष्टाचार करून राशनच्या तांदूळचा काळाबाजार होत असल्याच्या घटना एकामागुन एक समोर येत आहे. त्यातच 31 जुलै रोजी रात्री शिरपूर जैन पोलिसांनी तांदुळाने भरलेला ट्रक पकडला असून, सदर तांदूळ राशनचा असल्यावरुन कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य व्यक्ती अन्नधान्यात पासून वंचित राहू नये त्याकरिता शासनाने मोफत धान्य देण्याची योजना अमलात आणली. मात्र सदर योजनेचा गैरफायदा घेऊन राशन माफियांनी या तांदूळाची काळ्याबाजार विक्री केल्या जात आहे. राशन माफियांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळत असून, यापूर्वी मालेगांव, रिसोड, मंगरूळनाथ व कारंजा पोलिस स्टेशन अंतर्गत विविध कारवाया करून शेकडो क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला आहे. 31 जुलै रोजी रात्री च्या दरम्यान शिरपूर पोलिसांनी एमएच 40 एके 6144 नंबरच्या ट्रक चालकाला बिल्टी ची विचारणा केली असता ट्रक मधील व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यावरून संशय बळावल्याने ट्रकची झडती घेतली असता सदर ट्रकमध्ये जवळपास 30 क्विंटल तांदूळ असल्याचे दिसून आले त्यावरून शिरपूर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला लावला आहे. पुढील कारवाई शिरपूर पोलिसांकडून सुरू असल्याचे समजते.

 सदर जप्त करण्यात आलेला तांदूळ हा शासकीय धान्य वितरण प्रणालीतला आहे की नाही याची शहानिशा करण्याची जबाबदारी पुन्हा महसूल विभागाकडे येणार आहे.