डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, विद्यार्थिनीने लावला गळफास

August 01,2020

नागपूर : १ ऑगस्ट -डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगल्यामुळे एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. सीतालक्ष्मी नायर असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. नुकत्याच निकाल लागलेल्या १२ विच्या परीक्षेत तिला ७३ टक्के गुण मिळाले होते. तिला डॉक्टर व्हायचे होते त्यासाठी तिने पूर्व अभ्यासक्रमाला तिने अर्ज केला होता. त्या चाचणीपरीक्षेत ती अनुत्तीर्ण झाली. तीन दिवसापासून ती नैराश्याच्या गर्तेत होती. घरच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिने आज पहाटे ६.३० च्या सुमारास गळफास घेतला त्यातच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.