राममंदिरावर शिवसेना राजकारण करू इच्छित नाही - एकनाथ शिंदे

August 01,2020

नागपूर: १ऑगस्ट - अयोध्येतील श्रीराम मंदिर हा शिवसेना साठी राजकीय विषय नाही, राम मंदिर हा अस्मिता व श्रध्देचा विषय आहे. शिवसेना यावर राजकारण करू इच्छित नाही असे मत शिवसेना नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथे व्यक्त केले .

.ते आज गडचिरोली च्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहे. शिंदे यांनी विमानतळावर प्रसिध्दी माध्यमाशी आज संवाद साधला

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसतांना अयोध्येला जाऊन आले व मुख्यमंत्री झाल्यावर अयोध्येला गेले होते. त्यामुळे कोण काय म्हणते याला अर्थ नाही . विश्वहिंदू परिषद व भाजप कडून शिवसेनेला लक्ष्य  केल्या नंतर शिवसेनेने आपली भूमिका मांडली. 

सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आहे या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यास आम्ही प्रथम प्राधान्य दिले आहे, ही राजकारण करण्याची वेळ नाही, विरोधी पक्षाला शिंदे यांनी आपल्या शैलित उत्तर दिले, गडचिरोली मध्ये सीआरपीएफ,व पोलीस जवान मोठया प्रमाणात कोरोना बाधित झाले आहे याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की कोरोना योध्दे म्हणून पोलीस जवान कोरोना चा सामना करीत आहे, आम्ही त्यांची काळजी घेत आहे, आज बाधित पोलिस जवानांची भेट घेणार आहे, गडचिरोलीत ४ ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार का असे विचारले असता ते म्हणाले की मी आज आढावा घेईल त्यानंतर परिIस्थिती पाहून निर्णय घेऊ असे ते म्हणाले

गडचिरोलीत रस्ते नसल्यामुळे गरोदर महिलेला २५ किलोमिटर पायपीट करून रूग्णालयात जावे लागत आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की आपणा रस्तच्या विकासाची कामे सुरु करणार आहोत,नक्षलग्रस्त भागाच्या विकासाला प्राधान्य देणार आहे, भाजपने दूध दरवाढी साठी आंदोलन केले आहे याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले या संदर्भात कॅबिनेट मध्ये चर्चा झाली आहे, मुख्यमंत्री शेतकरी वसंघटनेच्या संपर्कात आहे, लवकरच तोडगा निघेल असे ते म्हणाले.