बिबट्याने केली हरणाची शिकार

August 01,2020

गोंदिया: १ ऑगस्ट - सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा वनपरिक्षेत्रांतर्गत शेंडा/ सालईटोला मार्गावरील विद्युत उपकेंद्राजवळ बिबट्याने एका हरणाची शिकार केल्याची घटना  पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. 

गावातील काही युवक नेहमी प्रमाणे सालईटोला मार्गावर पहाटे फिरायला गेले असता शेंडा वनपरिक्षेत्रांतर्गत सालईटोला/शेंडा मार्गावर झुडूपात बसून बिबट्याने एका हरिणाचा शिकार करून त्याला जागीच ठार केल्याची माहिती भ्रमनध्वनीद्वारे वनकर्मचार्यांना मिळताच क्षेत्रसहाय्यक शैलेश पारधी यांना देण्यात आली. दरम्यान पारधी हे आपल्या चमूसह घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून हरणाला आपल्या ताब्यात घेतला. विशेष म्हणजे नेहमीच परिसरातील गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ले होत असतात. त्यामुळे गावकर्यांमध्ये नेहमीच दहशतीचे वातावरण असते.