चोरट्यांनी दुकान फोडून चोरल्या १ लाख ८७ हजाराच्या बॅटऱ्या

August 01,2020

यवतमाळ : १ ऑगस्ट - आर्णी शहरातील सरताज बॅटरी ही दुकान फोडून चोरांनी १ लक्ष ८७ हजाराच्या बॅटर्या लंपास केल्याची घटना दिनांक ३0 जुलैला घडली आहे. याची रितसर तक्रार दुकान चालक शेख फारुख शेख उमर वय (वर्ष ४0) रा. मुबारकनगर यांनी दिली आहे. सदर तक्रारीत फियार्दी यांच्या मालकीचे माहूर रोड येथील सरताज इलेक्ट्रॉनिक्स दुकान चार चारचाकी वाहनाच्या बॅटर्या विक्रीचे दुकान आहे. दि. ३0 जुलैला सकाळी ८ वाजता दुकान उघडण्याकरिता गेलो असता दुकानाचे समोरील शटर अर्धवट उघडून व कुलूप तोडून दिसले तेव्हा मी दुकानात जाऊन पाहिले असता माझ्या दुकानातील नवीन बॅटर्या अमरॉन कंपनीच्या १0 नग किंमत ६२ हजार ९३ रु. व जुन्या बॅटर्या ३५ नग किंमत ४0 हजार रुपये, लोकांच्या चाजिर्ंग करीत असलेल्या बॅटर्या ८ नग किंमत ४५ हजार रुपये व भंगार सामान किंमत ४0 हजार रुपये असा एकूण १ लक्ष ८७ हजार ९३ रुपयाचे माल चोराने चोरुन नेले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरुन आर्णी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला.आहे तसेच पुढिल तपास एएसआय मानसिंग जाधव यांच्या सह राजेंद्र सरदारकर करीत आहे.