दूधसाठा जप्त

July 31,2020

नागपूर: ३१ जुलै - एमआयडीसी तील गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडवर आज अन्न व औषध विभागाने धाड टाकून १ लाख २८ हजार ५४० रुपये किमतीचा दूधसाठा जप्त केला. या कंपनीबाबत अनेक तक्रारी अन्न व औषधी विभागाकडे आल्या होत्या. या पेढीवर  युएचटी ट्रिटेड  होमोजिनइज्ड टोन्ड मिल्क याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. १९२८ लिटर दूध ताब्यात घेतले आहे. हि कारवाई विभागाचे सहआयुक्त चंद्रकांत पवार यांच्या कार्ग्दर्शनाखाली करण्यात आली.