आता बुलढाणा जिल्ह्यात तपासणी प्रयोगशाळा

July 16,2020

बुलढाणा : १६ जुलै - कोरोना रुग्णांचा वाढत आकडा लक्षात घेत खामगावमध्ये तपासणी लॅब असावी यासाठी स्थानिक आमदार आकाश फुंडकर यांनी पुढाकार घेतला. लोक सहभागासाठी प्रयन्त केले, त्यासाठी शहरातील दानशूर व्यक्ती विपीन गांधी यांनी २५ लाख रुपयांची मदत केली,तसेच अमोल ठाकरे यांनी सहकार्य केले. या प्रयत्नांना अखेर यश आले असून, राज्यातील लोकसहभागातून पहिली कोरोना टेस्टिंग लॅब खामगाव मध्ये निर्माण झाली आहे. 

बुलढाणा जिल्ह्यासह खामगाव शहरात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, कोविड रुग्णांच्या तपासणीसाठी  दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो म्हणून रुग्ण शोधण्यास विलंब होतो. मात्र आता जिल्ह्यातील खामगाव येथे कोरोना टेस्ट लॅब दोन दिवसात सुरु होणार असून, येथे दररोज ५० रुग्णांचे  नमुने तपासणी केली जाणार आहे. खामगावातील उद्योजक विपीन गांधी यांच्या पुढाकारातून हि लॅब पूर्णत्वास गेली आहे, अशी माहिती खामगाव मतदार संघाचे आमदार आकाश पुंडकर यांनी दिली.