युवक काँग्रेसमध्ये आहे असंतोष

July 16,2020

नागपूर : १६ जुलै - प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकांना खो देत थेट नेतापुत्रांच्या नियुक्त्या करण्याच्या प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या कार्यपद्धतीमुळे इच्छुकांमध्ये खदखद  निर्माण झाली आहे. याकडे पक्षाच्या श्रेष्ठींचे लक्ष वेधण्यात येत आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्व आघाड्यांच्या प्रमुखाची निवडणुकीतून निवड केली. त्यासाठी सदस्य अभियान राबविण्यात आले. नेत्यांनी वरून समर्थक लादू नये, कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी त्यांनी सुमारे नऊ वर्षांपूर्वी हा प्रयोग करण्यात आला. राहुल यांच्या या प्रयोगाला तांबे यांनी बगल देत थेट नियुक्त्या सुरु केल्या. त्यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत. त्यापैकी काही कार्यकर्त्यांनी थेट इ-मेल करून पक्षाच्या नेत्यांकडे तक्रार केल्याची माहित आहे. संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करून नियुक्त्या केल्याच्या दावा असंतुष्टांनी केला आहे. याउलट सक्रिय कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नियुक्तीचा दावा संघटनेकडून केला जात आहे.