ट्रक उलटून कालव्यात पडला, ३ जखमी

July 16,2020

वर्धा : १६ जुलै - वरुड येथून आष्टीमार्गाने आर्वीकडे पशुखाद्य घेऊन भरधाव वेगाने जात असलेला ट्रक रात्री  ९ च्या सुमारास  रस्त्याच्या कडेला असलेल्या कालव्यात जाऊन उलटला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना ट्रकबाहेर काढून उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. वेळीच मदत मिळाल्याने जखमींचा जीव वाचला. जखमींना आता अमरावतीच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. एमएच २७ ईएक्स क्रमांकाचा ट्रक ढेप घेऊन आर्वीकडे जातानाच ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक कालव्यात जाऊन आदळला यात ट्रकमधील मोहन बडांगे (३०), सुरज नेहारे  (२८) आणि ट्रकचा चालक महंमद अश्फाक नूर महंमद ट्रकमध्येच अडकले होते.