स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी प्रथमच गावात आली वीज

July 16,2020

गडचिरोली : १६ जुलै - गडचिरोली तालुका मुख्यालयापासून २० किमी. अंतरावरील अतिदुर्गम आदिवासी गाव कुच्चरवासीय स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही विजेअभावी अंधारात जीवन कंठत आहेत. मात्र नारगुंडा पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे गावात अखेर वीज जोडणी करण्यात आली. महावितरणच्या विद्युत पुरवठ्याची कुचेर गाव प्रकाशमान झाले. त्यामुळे नागरिकांनी पोलीस व प्रशासनाला धन्यवाद देत आनंदोत्सव साजरा केला. 

तालुका मुख्यालयापासून १५ किमीवर नारगुंडा हे गाव असून येथे पोलीस मदत केंद्र आहे. त्यामुळे तिथपर्यंत वीज जोडणी आहे. मात्र नारगुंडा पासून पाच किमीवर कुचेर गावापर्यंत कित्येक वर्षांपासून वीजखांब व तर जोडूनही वीजपुरवठा सुरु करण्यात आला नाही. परिणामी गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत होता. या बाबतीत नारगुंडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण वाघ यांनी वरिष्ठांकडे व वीज वितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला. तसेच गावकऱ्यांनी अनेकदा वीज जोडणीची मागणी केली होती. या सर्वांची दखल घेत वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रभाकर मेश्राम, केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांच्या हस्ते वीज पुरवठाच उदघाटन करण्यात आले,