वर्धा जिल्ह्यात आज 7 कोरोना बाधित रुग्ण सापडले

July 16,2020

वर्धा: १६ जुलै - वर्धा जिल्ह्यात आज 7 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून यामध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे यात आर्वी 2 ,वर्धा 3 ,कारंजा तालुक्यातील 2 रुग्ण आहेत.

आज बाधित झालेल्या रुग्णांमध्ये आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्स वय 35 वर्ष आणि अटेंडंट वय 55 वर्ष, वर्धा शहरातील इतवारा येथील 72 वर्षीय महिला , हिंद नगर येथील 75 वर्षीय पुरुष आणि केशव सिटी येथील 37 वर्षीय पुरुष तसेच कारंजा तालुक्यातील काकडा येथील 30 वर्ष पुरुष आणि 20 वर्षीय महिला या रुग्णांचा समावेश आहे. यातील दोन रुग्णांना सेवाग्राम येथे तर पाच रुग्णांना सावंगी रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. या रुग्णासहित जिल्ह्यातील रूग्णसंख्या 58 झाली असून यापैकी 29 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. जिल्ह्यातील कारंजा तालुका कोरोना पासून सुटला होता आता त्याही तालुक्यात कोरोना पोहोचला आहे.