देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करण्याचा आनंद क्षणिक

July 16,2020

मुंबई: १६जुलै -  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी देणार असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगत आहे. याच संदर्भात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी एक ट्विट केलं. काही वेळातचं हे ट्विट तुफान व्हायरल झालं. देवेद्र फडणवीस यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. मात्र, काही वेळातचं हे ट्विट डिलीट करण्याची नामुष्की हर्षवर्धन पाटील यांच्यावर आली.

आज भाजप नेते आणि इंदापुरचे माजी आमदार यांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय संसदीय समितीमध्ये नेमणूक झाली म्हणून अभिनंदनाचे ट्विट केले. मात्र, काही वेळातचं त्यांना हे ट्विट डिलीट करावे लागले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय संसदीय समितीमध्ये नेमणूक सुरू झाल्याचं ट्विट हर्षवर्धन पाटील यांनी केल्यानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. मात्र, अद्याप फडणवीस यांना अधिकृतरित्या केंद्रीय समितीचा निरोप नाही. याबाबत खुलासा करणारं ट्विट भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये  यांनी केले आहे.