अमरावतीत रुग्णसंख्या वाढतेय वेगाने

July 16,2020

अमरावती: १६जुलै - कोरोना रुग्णाची संख्या अमरावतीत वेगाने वाढत आहे. बुधवारी ५९ नवीन रुग्ण बाधित झाल्यानंतर गुरुवारी सकाळी १४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता ३७० रुग्ण कोरोना क्रियाशील आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ७२ रुग्ण कोरोनाग्रस्त झाले. त्यापैकी ३७० रुग्ण क्रियाशील असून त्यातील 10 रुग्णांना नागपूरात हलविण्यात आले आहे. आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 667 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुरजनगर 31 वर्षीय पुरुष, राहुलनगर 39 वर्षीय महिला, रामपुरी कॅम्प 45 वर्षीय पुरुष, अलंकार कॉलनी नवे बडनेरा 61 वर्षीय महिला, साजियानगर 50 वर्षीय महिला, पूर्णानगर 60 वर्षीय पुरुष, खापर्डे बगीचा 64 वर्षीय महिला, अंबिकानगर 10 वर्षीय मुलगा, नागपुरी गेट 42 वर्षीय पुरुष, हनुमाननगर 38 वर्षीय पुरुष, अंबिकानगर 65 वर्षीय महिला, निषाद कॉलनी 59 वर्षीय पुरुष, अंबिका नगर पाच वर्षीय बालकाचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. या नवीन 14 रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अमरावतीत सध्या रॅपिड अँटिजन टेस्टींग सुरू झाले आहे.